Farmer ID : शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; जाणून घ्या कशी करायची नोंदणी?
15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. या ओळख क्रमांकासाठी नोंदणी कशी करायची आणि त्याचे फायदे काय, त्याबद्दल जाणून घेऊयात..
देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता ‘शेतकरी ओळख क्रमांक’ म्हणजेच ‘फार्मर आयडी’ बंधनकारक करण्यात आलंय. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID अनिवार्य करण्यात आलाय. परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यात या प्रकल्पाविषयीची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांना या मोहिमेअंतर्गत ॲग्रीस्टॅक योजनेत मोफत नोंदणी करण्यात येते. फार्मर आयडीसाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्र, ग्राममहसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. फार्मर आयडीचे शेतकऱ्यांना फायदे अनेक आहेत. हा फार्मर आयडी कसा काढायचा, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, त्याची नोंदणी कुठे आणि कशी करायची, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

