Jalgoan Gold Rate | आताच सोनं खरेदी करा बरं… गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त; काय आहेत आजचे भाव?
अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता जळगावच्या सराफ बाजारावर स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे सोनं आणि चांदीचे भाव प्रचंड घसरणीस आले आहेत. सोने व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या 23 दिवसांत सोन्याचे भाव जवळपास 34 हजारांनी घटले असून, चांदीचे भाव सुमारे 85 हजारांनी कमी झाले आहेत.
अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता जळगावच्या सराफ बाजारावर स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे सोनं आणि चांदीचे भाव प्रचंड घसरणीस आले आहेत. सोने व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या 23 दिवसांत सोन्याचे भाव जवळपास 34 हजारांनी घटले असून, चांदीचे भाव सुमारे 85 हजारांनी कमी झाले आहेत. ही मागील 40 वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. एका दिवसाचा विचार केला तर सोन्याचे भाव जवळपास 8 हजारांनी तर चांदीचे भाव सुमारे 20 हजारांनी कमी झाले आहेत, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. तसेच, अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे आलेल्या तेल संकटामुळे (Oil Crisis) ट्रान्सपोर्टेशनमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत, ज्याचा सराफ बाजारावरही परिणाम झाला आहे. व्यावसायिकांच्या मते, जागतिक घडामोडींचा सरळ परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्यामुळे सोनं आणि चांदी खरेदी-विक्रीचे भाव सतत बदलत आहेत.
Published on: Mar 23, 2026 02:23 PM
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...

