छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कारवाई केली आहे. या पानटपरीवरील फरसाण खाल्ल्याने एका मुलाला त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने संबंधित पानटपरीची तपासणी केली. तपासणीदरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पानटपरीमध्ये मोठ्या प्रमाणात मुदत बाह्य बिस्किटांचा साठा आढळून आल्याने तो जप्त केला. ही कारवाई सुरू असताना काही […]
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कारवाई केली आहे. या पानटपरीवरील फरसाण खाल्ल्याने एका मुलाला त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने संबंधित पानटपरीची तपासणी केली. तपासणीदरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पानटपरीमध्ये मोठ्या प्रमाणात मुदत बाह्य बिस्किटांचा साठा आढळून आल्याने तो जप्त केला. ही कारवाई सुरू असताना काही स्थानिक तरुणांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना जाब विचारला.
इतकेच नाही, तर जप्त करण्यात आलेली मुदत बाह्य बिस्किटं अधिकाऱ्यांना खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. एफडीए अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, अन्नसुरक्षेबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Published on: Aug 29, 2026 05:36 PM
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...

