Vaishnavi Hagawane Case : फायदा करून देणार 100 टक्के… अंजली दमानियांचा जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप, थेट ऐकवली ऑडिओ क्लिप
वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायन्सस सुपेकर यांनी दिलं होतं. जालिंदर सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे होती, म्हणूनच त्यांनी हे सर्व केलं असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालींदर सुपेकर यांच्यावर आरोप केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकारांचा आवाज असल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय. या प्रकरणामधून माझं नाव काढा, असं जालिंदर सुपेकर अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा अंजली दमानिया यांच्याकडून केला जात आहे. तर हगवणे कुटुंबानं आपल्या घरातील सूनांना सुपेकारांचा धाक दाखवला. सुपेकारांचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केले आहेत. तर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही कथित ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. ही ऑडिओ क्लिप माध्यमांना ऐकवत अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र टीव्ही नाईन मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.