Vaishnavi Hagawane Case : एक मोठी अपडेट, वैष्णवी हगवणेचा फरार सासरा अन् दीर…
वैष्णवी मृत्यू प्रकरणात १७ मे रोजी वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना आधी अटक झाल्यानंतर आता सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते होते. मात्र हा प्रकार समोर येताच त्यांची काल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, शंशाक आणि वैष्णवी यांच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर अनेक गृहउपयोगी वस्तू दिल्या होत्या. त्यानंतरही तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर हगवणे कुटुंबांकडून मोठ्या सुनेचाही छळ केला जात होता. हे स्वतः मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले.
Published on: May 23, 2025 08:37 AM
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
