Video : राज ठाकरे यांची अचानक तब्येत बिघडल्यानं मुंबईला गेले- वसंत मोरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेची तारीख जाहीर केल्यानंतर, आपण एक्टिव्ह होणार आहोत, अशी माहिती पुण्यातील मनेसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. जर सभेच्या तयारीसाठी ठाण्यात आणि संभाजीनगरला जाऊ शकतो, तर पुण्यात जोरदार तयारी करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सभा राजकीयदृष्ट्या आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) […]

आयेशा सय्यद

|

May 19, 2022 | 5:20 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेची तारीख जाहीर केल्यानंतर, आपण एक्टिव्ह होणार आहोत, अशी माहिती पुण्यातील मनेसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. जर सभेच्या तयारीसाठी ठाण्यात आणि संभाजीनगरला जाऊ शकतो, तर पुण्यात जोरदार तयारी करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सभा राजकीयदृष्ट्या आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) दृष्टीने महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेसाठी आपल्यापद्धीतने तयारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलं. तेव्हापासून वसंत मोरे नाराज आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांना डावललं जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांची अचानक तब्येत बिघडल्यानं ते मुंबईला गेले,  असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें