‘…तर मी पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येतो’ वसंत मोरे यांनी माऊलींना काय घालं साकडं?
याचदरम्यान या पोटनिवडणूक आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील उडी टाकली आहे. त्यामुळे येथे चांगलाच ट्विस्ट पहायला मिळतोय. येथे मनसेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते.
पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असून यासाठी अनेक इच्छूकांनी दावा सांगायला सुरुवात केलीय. याच जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच होत आहे. तर भाजपमध्ये देखील स्पर्धा पहायला मिळत आहे. याचदरम्यान या पोटनिवडणूक आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील उडी टाकली आहे. त्यामुळे येथे चांगलाच ट्विस्ट पहायला मिळतोय. येथे मनसेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर हा फक्त स्टंट असेल असे बोलले जात असतानाच आता मोरे यांच्या एका साकड्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मोरे यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माऊलींना साकडं घालताना माझा पक्ष वाढो अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार होऊन यायला आवडेल अशी इच्छा पुन्हा बोलवून दाखवली. तर आळंदीत पोलिस प्रशासनाने केलेल्या लाठीचार्ज सारखी घटना पुन्हा घडू नये अशी विनंती प्रशासनाला केली आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

