Video | वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, त्यानंतर म्हणाले लोकसभा तर….
मनसेचे पुण्यातील सक्रीय नेते वंसत मोरे यांनी अलिकडेच मनसेचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा जगजाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा शरद पवार यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेतल्याने पत्रकारांनी त्यांना घेरले. अनेकदा प्रश्न विचारुन देखील त्यांनी पक्ष प्रवेशासाठी आपण गेलो नव्हतो असे स्पष्ट केले.
पुणे | 14 मार्च 2024 : पुणे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला काय ? असा सवाल केला जात होता. वसंत मोरे यांना पत्रकारांनी आज चांगलेच भंडावून सोडले. तात्या आपण शरद पवार गटात प्रवेश करणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर पत्रकारांनी केली. त्यावर वसंत मोरे यांनी स्पष्टपणे काही उत्तर दिले नाही. आपण पक्ष प्रवेशासाठी नव्हे तर लोकसभा निवडणूकी संदर्भातच फक्त शरद पवार यांना भेटायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आज आमदार निलेश लंके यांनी देखील शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. परंतू वसंत मोरे आणि निलेश लंके या दोघांनीही आपली पुढील राजकीय दिशा न सांगता सर्वांना संम्रभावस्थेतच ठेवले.
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको

