Video: साताऱ्यात 5 वर्षात कुठलही विकासकामं नाही- शिवेंद्रराजे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याकरांना हे कळणे आवश्यक आहे की, मागच्या वेळी भावनेच्या भारत केलेल्या मतदानाचा काय परिणाम झाला असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक वॉर पाहायला मिळत आहे. साताऱ्यात पाच वर्षात कुठलीच. कामं झाली नसल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला आहे. याशिवाय सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. एक पत्रक जारी करून शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर आरोप केले आहेत. साताऱ्यातले नगरसेवकच एकमेकांची उणीधुणी काढतात, याशिवाय तेथील भ्रष्टाचाराचे प्रकार देखील यामुळे भर येत आहेत असेही शिवेंद्रराजे म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याकरांना हे कळणे आवश्यक आहे की, मागच्या वेळी भावनेच्या भारत केलेल्या मतदानाचा काय परिणाम झाला असेही शिवेंद्रराजे म्हणाले. उदयनराजे यांनी केंद्र सरकारकडून कुठलाच निधी आणलेला नाही, जो निधी मिळाला तो राज्य सरकारकडूनच मिळाला असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
