Mumbai | मुंबईच्या अंधेरीमध्ये महिला मॅनहोलमध्ये पडता-पडता बचावली, घटनेचा व्हिडीओ समोर

मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डीएन नगर परिसरात देखील एक महिला साचलेल्या पाण्यातून चालत होती. पोटरीभर पाणी असल्यामुळे रस्ते, खड्डे किंवा मॅन होल यांचा अंदाज येत नव्हता. चालता चालता महिलेचा पाय अडकला आणि ती खाली पडली. महिला मॅन होलमध्ये पडण्याची भीती होती, मात्र शेजारुन जाणाऱ्या पादचारी महिलेने तिला उभं राहण्यासाठी वेळीच हात दिला. त्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI