Mumbai | मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला, 3 जण पोलिसांच्या ताब्यात

बोरिवली भागात दिवसाढवळ्या झालेल्या तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे

शहरात वाढत्या गुन्हेगारीची आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.

तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्य मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI