Mumbai Rain Update | मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. तुळशीपाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. तुळशीपाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचं संकट कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज सकाळी 9 वाजता भरुन‌‌ वाहू लागला आहे‌. गेल्यावर्षी दिनांक 5 ऑगस्‍ट 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI