“हू इज अनिल बोंडे?, लायकीत राहून टीका करावी”, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नसतो, अशी टीका बोंडे यांनी केली होती. बोंडे यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही अनिल बोंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुणे : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नसतो, अशी टीका बोंडे यांनी केली होती. बोंडे यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही अनिल बोंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.”अनिल बोंडे यांची उंची किती आहे? अनिल बोंडे असं बोलले असीतल आणि एकनाथ शिंदे यांना रेफर करून बोलले असतील तर चुकीचं आहे. त्यांनी असं विधान केलं असेल तर दुर्देवी आहे. कुणी टीका करावी याला महत्त्व असतं. कुणी उठसूट टीका करेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. टीका तेवढ्या ताकदीच्या माणसाने केली असेल तर उत्तर दिलं पाहिजे. समज गैरसमज दूर केले पाहिजे”, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं. परंतु, “मी फडणवीस यांच्या किती जवळ आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची बेजबाबदार विधान करणे हे चुकीचं आहे. बोंडेंना विचारून युतीचं काही होणार आहे? हू इज बोंडे? मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी लायकीत राहावं”, असं शिवतारे म्हणाले.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

