Walmik Karad : वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंना मारलं? विजयसिंग बांगर यांचा मोठा गौप्यस्फोट
Vijaysing Bangar Allegations On Walmik Karad : वाल्मिक कराडचे जून सहकारी विजयसिंग बांगर यांनी कराडवर गंभीर आरोप केलेले आहेत.
बीडमध्ये, परळीत वाल्मिक कराडने अनेक लोक मारले. वाल्मिक कराडने मारलेल्या लोकांपैकी एक महादेव मुंडे आहेत, असा मोठा गौप्यस्फोट विजयसिंग बांगर यांनी केला आहे. विजयसिंग बांगर हे वाल्मिक कराडचे जून सहकारी आहेत. त्यांनी संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. तसंच काही जुन्या कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी यावेळी ऐकवलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या काळया करनाम्यांचा चिठ्ठा समोर आला आहे.
यावेळी बोलताना बांगर म्हणाले की, वाल्मिक कराडने माझ्या आईला देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. त्यांच्यावर काही दबाव असेल तर मी स्वत: त्यांच्या बाजूने वाल्मिक कराडच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी तयार आहे. मी याबद्दल मुंडे यांच्या कुटुंबाशी चर्चा करेल. संपूर्ण परळीला माहिती आहे, की वाल्मिक कराडने किती लोकांना मारलं आहे, मी येणाऱ्या काळात याबद्दल नावासह अधिक खुलासे करेल, असंही यावेळी बांगर यांनी म्हंटलं.

आधी मंत्रालय आता विधानभवन?15 दिवसात हाणामारीच्या दोन घटना, चाललंय काय?

हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हनीट्रॅप प्रकरणी नाशिकच्या 'त्या' हॉटेलबद्दल आव्हाडांचा गौप्यस्फोट

ते मला मारण्यासाठी आले होते, पण.. ; राड्यानंतर आव्हाडांचं मोठ विधान
