Vijay Wadettiwar : ‘होय.. माझ्या वक्तव्यावर मी ठाम’, पुणे गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम आहे. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून वडेट्टीवार संतापले आहेत.
मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम असल्याचे दिसतंय. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे , असं अजितदादा यांनी त्यावर उत्तर दिलं. तर दुसरीकडे एखाद्या कुटुंबाबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यात्या घटनेवरून विजय वडेट्टीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे? त्या मंगेशकर फॅमिलीने नेहमीच गाणं चांगलं गायलं म्हणून सर्वांनी मिरवलं. लता दीदी आशा दीदी हे दीदी ते दीदी ज्या माणसाने खिलारे पाटील यांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी यांच्यात कसली माणुसकी आहे. यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर केला होता. दरम्यान, ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालय आणि त्याच्या ट्रस्टची कारनामे समोर आले. ज्या खिलारे कुटुंबाने रुग्णालयासाठी जमीन दान केली त्या खिलारे कुटुंबालाही मंगेशकर कुटुंबाने सोडलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. मंगेशकर कुटुंबाचे योगदान मोठे आहे ते जगाला माहीत आहे असं अजित पवार म्हणाले. पण वडेट्टीवार मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

