Ladki Bahin Yojana : सरकारी पैशातून मत खरेदी…, ‘लाडकी बहीण’वरून वडेट्टीवारांची सडकून टीका

| Updated on: Jul 05, 2024 | 4:24 PM

महागाई, गॅस सिलेंडरचे दर वाढवून सामान्य जनतेला सरकारने लुटले आहे. आम्हाला एक बहिणीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पत्र आलं, त्यात म्हटलं आहे, १५०० रूपये देण्यापेक्षा महागाई कमी करा, असं पत्रात म्हटलं असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

लुटणाऱ्या सरकारला बहिणी निवडणुकीत मतदान देणार नाहीत. महागाई, गॅस सिलेंडरचे दर वाढवून सामान्य जनतेला सरकारने लुटले आहे. आम्हाला एक बहिणीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पत्र आलं, त्यात म्हटलं आहे, १५०० रूपये देण्यापेक्षा महागाई कमी करा, असं पत्रात म्हटलं असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर विजय वडेट्टीवार यांनी टीका करताना असेही म्हटले की, ‘लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशातून मत खरेदी करण्याचा प्रकार आहे आणि तो जनतेनं ओळखला आहे. बहिणांना अर्थसहाय्य करण्याची सदबुद्धी सरकारला वर्षभरापूर्वी का मिळाली नाही निवडणुकीच्या तोंडावरच सरकारने का योजना जाहीर केली?’, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला. पुढे वडेट्टीवरार असेही म्हणाले की, लाडकी बहीण योजना जाहीर केल्यातून काही निष्पन्न होणार नाही तर शासकीय निधीतून मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

Published on: Jul 05, 2024 04:24 PM