शिंदेंना मावळ्याचा सरदार आणि सरदारचा जाहागीरदार कुणी केलं? ‘त्या’ टीकेवर वडेट्टीवारांचा सवाल
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजा का बेटा राजा नही बनेगा...असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेवर बोलताना वडेट्टीवार यांनी सवाल केला आणि म्हणाले, मावळ्याचा सरदार आणि सरदारचा जाहागीरदार कुणी केलं?
एकनाथ शिंदे यांना जहागीरदार कुणी केलं? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजा का बेटा राजा नही बनेगा…असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेवर बोलताना वडेट्टीवार यांनी सवाल केला आणि म्हणाले, मावळ्याचा सरदार आणि सरदारचा जाहागीरदार कुणी केलं? ‘मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. तर राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा… बाळासाहेबसुद्धा आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु हे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात…घरात बसून पक्ष वाढत नाही… राज्य चालवता येत नाही’, असे वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केलाय.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

