चंद्रपुरातील मारहाण प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय घटना : विजय वडेट्टीवार
तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाणीचा प्रकार पुढे आला आहे. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. यापैकी पाच जण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गावातील नागरिक मारहाणीत सहभागी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विडय वडेट्टीवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आपण कोणत्या युगात आहोत, या घटनेमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केलेली आहे. पोलीस अजून तपास करत आहेत. कायदे असूनही ही घटना घडते त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी कडकपणे करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

