“…त्यावेळी बाळू धानोरकर यांनी मला साथ दिली होती”, विजय वडेट्टीवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते. एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या नेत्याला गमावण्याचा दु:ख आम्हाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकरांची आठवणींना उजाळा दिला आहे.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द

