Beed News : वकील ज्ञानेश्वरी अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
Beed Ambajogai Crime News : बीडच्या अंबाजोगाईत वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अंजान यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आज बीडच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.
बीडच्या अंबाजोगाईत वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अंजान यांच्या विरोधात आता ग्रामस्थ एकवटले असून वकील ज्ञानेश्वरी अंजान यांनीच त्रास दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यासाठी आज ग्रामस्थ बीड पोलीस अधिक्षकांच्या भेटीसाठी निघाले आहेत. रखरखत्या उन्हातच हे संतप्त ग्रामस्थ पोलीस अधिक्षकांच्या भेटीला निघाले आहेत. या मारहाणीची सखोल चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. ज्ञानेश्वरी अंजान यांच्याकडून करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत. आम्ही कोणीही त्यांच्या पाठीशी नाही. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणण आहे.
Published on: Apr 22, 2025 01:58 PM
Latest Videos
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा

