Special Report | विनायक मेटेंचे शेवटचे शब्द

विनायक मेटेंना त्यांच्या पत्नीनं रात्रीचा प्रवास करु नका, असं सांगितलं होतं. पण मेटेंना दुसऱ्या दिवशी असलेल्या बैठकीला उपस्थिती लावायची होती.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 16, 2022 | 1:41 AM

बीड : विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनं दिलेली प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे. विनायक मेटेंचा अपघात झाला. तेव्हा त्यांच्या पत्नी मुंबईतल्या निवासस्थानी होत्या. अपघात झाल्यानंतर त्यांना मेटेंच्याच फोनवरुन फोन आला होता. पण हा फोन काहीतरी वाईट बातमी सांगणारा असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. विनायक मेटेंना त्यांच्या पत्नीनं रात्रीचा प्रवास करु नका, असं सांगितलं होतं. पण मेटेंना दुसऱ्या दिवशी असलेल्या बैठकीला उपस्थिती लावायची होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें