उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? विनायक राऊत स्पष्टच बोलले…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आवाहन करत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी बॅनर्सही झळकले आहेत. या चर्चांवर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरु आहे. या सत्तानाट्या दरम्यान पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? अशी चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आवाहन करत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी बॅनर्सही झळकले आहेत. राज आणि उद्धव एकत्र येणार का? या चर्चांवर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसेमध्ये काय चर्चा झाली, मला तर माहित नाही. त्यांना जर वाटत असेल तर थेट पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करावी,” असं विनायक राऊत म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 11:14 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

