AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली T-20 वर्ल्ड कपची कॅप्टन्सी सोडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

विराट कोहली T-20 वर्ल्ड कपची कॅप्टन्सी सोडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 10:24 AM
Share

विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही.

टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर आला असताना, टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. कारण नव्या रिपोर्टनुसार विराट कोहली (Virat Kohli) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी T20 विश्वचषकानंतर हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. रोहितला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्याने आपलं नेतृत्त्व सिद्ध केलं. IPL मध्येही (IPL 2021) त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपदं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर आहे.