VHP Guidelines for Garba : गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश? मुस्लिमांना नो एन्ट्री! विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय? आधार कार्ड चेक होणार!
विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांसाठी मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. व्हीएचपीने आधार कार्ड तपासून आणि भगवा तिलक लावून प्रवेश देण्याची सूचना दिली आहे. या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली आहे तर भाजपने समर्थन केले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेने विदर्भातील गरबा आयोजकांना सूचना दिल्या आहेत की, मुस्लिम लोकांच्या गरब्यातील सहभागाला बंदी घाला आणि प्रवेशासाठी आधार कार्ड तपासणी करा, इतकंच नाहीतर यावेळी भगवा तिलक आणि देवीचे पूजन करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी याला धार्मिक कट्टरता म्हटले आहे तर भाजपने विश्व हिंदू परिषदेचे समर्थन केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
Published on: Sep 20, 2025 09:51 PM
Latest Videos
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

