Pandharpur : भाविकाला काठीणं मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी, जाब विचारताच बघा काय केलं?
विठुरायाच्या दर्शनासाठी तासनतास उभा असलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकाने अचानकपणे हल्ला केल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमी भाविक रक्तबंबाळ अवस्थेत असतानाच इतर भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आणि संबंधित रक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली.
नागपूरहून आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत भाविक गंभीर जखमी झाला असून त्याच्या दंडावर आणि पाठीवर मार लागल्याची माहिती आहे. गोपाळपूर रोडवरील पत्राशेडजवळ विठ्ठल दर्शनासाठी उभारलेल्या रांगेत हा धक्कादायक प्रकार घडला. खासगी सुरक्षा रक्षकाने भाविकला केलेल्या बेदाम मारहाणीत भाविक रक्तबंबाळ झाला आहे. दरम्यान, याबाबत मंदिर प्रशासनाला विचारणा केली कोणतेही उत्तर मिळाले नाही. याउलट विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांची अरेरावी पाहायला मिळाली असून मी या विषयावर बोलणार नाही म्हणत टीव्ही ९ मराठीचे पत्रकार रवी लव्हेकर यांच्या हातून मोबाईल काढून घेत काय करायचे ते करा असे उर्मट भाषेत वर्तन केल्याते पाहायला मिळाले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

