Washim BJP : मी पद, सत्तेसाठी हापापलेला नाही… कार्यकर्त्याकडून चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे आभार, कुठं होतेय चर्चा?
सध्या राज्यभरात स्थानिक निवडणुकीच्या चर्चा होताना दिसताय. कुठं कोणाची बिनविरोध निवड होतेय तर कुठं कोणाची उमेदवारी नाकारली जातेय. अशातच वाशिममधून एक प्रकार चांगलाच चर्चेत आहे.
वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपच्या अभियंता सेलचे विभागीय सह संयोजक धनंजय घुगे यांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं त्यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर लावलेत आणि पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याची संधी दिल्याचा मजकूर बॅनर वर लिहलाय. या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्या नंतर मी पक्ष सोडेल किंव्हा पक्षाच्या उमेदवाराला अडाणीत आणण्याचे कामं करेल अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षासी एकनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी बॅनर लावलेत असं त्यांनी सांगितलं.
Published on: Nov 22, 2025 02:03 PM
Latest Videos
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

