मनोज जरांगे मविआच्या काळात जन्मला नव्हता का? भाजपा नेत्याचा तिखट सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांनी नुकताच आपला मराठवाडा दौरा शांततो मोर्चा संपवला आहे. त्यांनी येत्या विधानसभेत भाजपाचे उमेदवार पाडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता भाजपाचे नेते जोरदार टिका करीत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर भाजपाचे नेहमीच वादग्रस्त विधानं करणारे नेते अनिल बोंडे यांनी जोरदार टिका केली आहे. मनोज जरांगे उद्धव ठाकरे यांच्या मविआच्या सरकारमध्ये जन्माला आला नव्हता का ? मग जरांगे त्यांच्या काळात मराठा आरक्षणसाठी आंदोलन केले नाही. म्हणजेच हा शरद पवारचा माणूस आहे अशी टिका भाजपाचे अनिल बोंडे यांनी केली आहे.यावर मनोज जरांगे यांनी तितक्याच जोरदारपणे टिका करताना अनिल बोंडे याने उद्धव ठाकरे यांच्या सरकार असताना जन्माला आला नव्हता ? उद्धव ठाकरे यांचे युतीचे सरकार असताना तो जन्मला असेल तर त्यांनी सोशल मिडीयातील मागच्या पोस्ट चाळाव्यात असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे.फडणवीसांनी कसले दळीद्री लोक आणलेत हे एकेदिवशी भाजपाला बुडवतील अशी टिका जरांगे पाटील यांनी केली आहे.
Latest Videos
Latest News