गुलाबराव पाटील यांचा ठाकरे यांना टोला; म्हणाले, ‘पथ्य’ पाळायला हवं
त्यावरून आता शिंदे गटाकडून देखील टीका होताना दिसत आहेत. आता ही याच वक्तव्यावरून ठाकरे यांच्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे यांना टोला लगावलाय.
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कलंक शब्दप्रयोग केला होता. त्यावरून आता शिंदे गटाकडून देखील टीका होताना दिसत आहेत. आता ही याच वक्तव्यावरून ठाकरे यांच्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे यांना टोला लगावलाय. त्यांनी, राज्याच्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं असं म्हटलं आहे. मला तर वाटतं की असे शब्द वापरण्यामध्ये काही अर्थ नाही. टीका टिप्पणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण कोणालाही काहीही बोलणं उचित नाही. मोठ्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोललं तर ठीक आहे, पण राज्याच्या नेत्यांनी अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली तर खाली काय होईल? त्यांना आवरण मुश्किल होईल, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

