‘साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही…, ‘ काय म्हणाले उदय सामंत
२३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागण्यानंतर अखेर आज बुधवार ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे.त्याची तयारी सुरु असताना एकनाथ शिंदे यांच्या नावाचा शपथविधीच्या आमंत्रण पुत्रिकेवर उल्लेखच नसल्याने गोंधळ उडाला आहे.
राज्यात नव्या सरकारचा शपथविधीच्या सोहळ्याची तयारी मोठ्या जल्लोषात सुरु आहे. परंतू या शपथविधीचा एक भाग असलेल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार की नाहीत यावर संशय आहे. त्यामुळे एकनाश शिंदे गटाचे आमदारांना काल त्यांची भेट घेतली होती. यावर आता आमदार उदय सामंत यांनी आम्ही २५ वर्षे राजकारणात आहोत. परंतू आमचं राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहेत. त्यामुळे आम्ही काल त्यांना सरकारच्या शपथविधी सहभाग घेऊन शपथ घेण्याची विनंती केलेली आहे. त्यावर ते योग्य निर्णय घेतील. शिंदे यांनी मोदी आणि शाह यांच्या निर्णयाला आपला अडसर नसणार संपूर्णपणे पाठींबा असेल असेही जाहीर केलेले आहे. आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती शपथ घ्या. त्यांनी दिलखुलासपणे आणि खिलाडूपणाने वृत्तीने आपली भूमिका मांडली होती. आता त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतील त्यांच्या मागे आम्ही ६० आमदार असणार असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.