AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal By Election Voting | पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; भवानीपूरमध्ये ममता- अधिकारी आमने-सामने

West Bengal By Election Voting | पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; भवानीपूरमध्ये ममता- अधिकारी आमने-सामने

| Updated on: Apr 29, 2026 | 10:28 AM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात एकूण 142 जागांसाठी सुमारे 3 कोटी 21 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात एकूण 142 जागांसाठी सुमारे 3 कोटी 21 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुभेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. ही लढत या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला गड कायम राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर राज्यात सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होणार आहे.

 

Published on: Apr 29, 2026 10:28 AM
Follow Us