Special Report | ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अर्थ काय?
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली.
मुंबई : देशात सध्या भाजपला जोरदार टक्कर देणारे पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेकडे पाहिलं जात आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संजय राऊत यांनीही या बैठकीत राजकारणावर चर्चा झाल्याचं ट्विटरवरुन सांगितलं आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
