उद्धव ठाकरेंचं काय करायचं ते करा, पण… राज ठाकरेंनी अमित शाहांना काय सांगितलं होतं?; नवा गौप्यस्फोट काय?
'महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही तर...'
शिवसेनेतून ४० आमदार फुटले तोपर्यंत ठीक होतं. पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकांना पटलं नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, अमित शाहांना प्रत्यक्ष भेटीत मी हे सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुमचे जे काही राजकारण करायचे ते करा, पण राजकारणात बाळासाहेबांना आणू नका, असे स्पष्टपणे म्हटले. पुढे राज ठाकरेंनी असेही सांगितले की, महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही तर मुस्लिम गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला मतदान करण्यात आलं, असं राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना म्हटलं.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

