Special Report | माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कुठं?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील 100 कोटी वसूली प्रकरणाचे आरोप आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी बरोबरच सीबीआयकडून तपास सुरु आहे. पण अनिल देशमुखांचा अजून पत्ता लागत नाहीय.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील 100 कोटी वसूली प्रकरणाचे आरोप आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी बरोबरच सीबीआयकडून तपास सुरु आहे. पण अनिल देशमुखांचा अजून पत्ता लागत नाहीय. मात्र, सीबीआयचे अधिकारी पुन्हा एकदा नागपूर पासून ते मुंबईतल्या निवासस्थानी येऊन धडकले आहेत. महत्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने छापेमारी केली, तेव्हा देशमुखांच्या घरी कोणीच नसल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयने सकाळी 8 च्या सुमारास ही छापेमारी केली. सहा-सात अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपुरातील घरात प्रवेश करुन झाडाझडती सुरु केली. सीबीआयच्या धाडीननंतर देशमुखांच्या घराबाहेर तणावपूर्ण शांतता दिसत आहे. घराबाहेरील गेट बंद आहे. सीबीआयच्या याच धाडसत्राविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

