सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणारा ‘तो’ नेता कोण? शरद पवारांकडे आणखी एका बडा नेता येणार?
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केल्यानंतर शरद पवार गटात आणखी एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार? सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणारा नेता कोण ?
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. इंदापूर येथे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा हा पक्ष प्रवेश झाला. यानंतर आता शरद पवार गटात आणखी एका बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसलेल्या एका नेत्यानं आपला चेहरा लपविल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणारा ‘तो’ नेता नेमका कोण? असा सवाल केला जात आहे. पुण्यातील मोदी बागेतून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने मीडियापासून आपला चेहरा लपविला. सुप्रिया सुळे यांच्या गाडीमध्ये पुढे सुप्रिया सुळे बसल्या होत्या आणि मागच्या बाजूला खिडकी जवळच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता. त्याने आपला चेहरा झाकला होता. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण? अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात

