भांगेची नशा नेमकी कुणाला चढली? मंत्री आणि माजी मंत्री यांच्यात जोरदार जुंपली
शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला. ना एक अँब्युलन्स दिली गेली. याची नाराजी माझ्या मनात आहे.
सातारा : कराड ते सातारा अशी चार दिवस शेतकरी पदयात्रा काढली. मात्र, या पदयात्रेत पालक मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काही सोय केली नाही. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे माहित नाही. मात्र, तो भाग्यवान माणुस आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला. ना एक अँब्युलन्स दिली गेली. याची नाराजी माझ्या मनात आहे अशी भावना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर बोलून दाखविली. तसेच, सत्ता भांग पिल्यासारखी अंगात आले की माणुस डुलायला आणि नाचायला लागतो. मात्र, नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असते अशी टिकाही त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच नाव न घेता केली होती. त्यावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चांगलाच पलटवार केलाय. सदाभाऊच भांग पित असतील त्यामुळे त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केले असा टोला देसाई यांनी लगावला. आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते असेही ते म्हणाले.
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
