AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य का करतात?

Special Report | राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य का करतात?

| Updated on: Jul 30, 2022 | 9:37 PM
Share

महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीपासून राज्यपाल कोश्यारी पहिल्यांदाच चर्चेत आले. शपथेवेळी लिहिलेल्याऐवजी इतर शब्दांचा उच्चार केल्यामुळे कोश्यारींनी शपथ रोखली. मात्र तीच गोष्ट नंतर शिंदेंच्या शपथविधीवेळी झाली, तेव्हा मात्र राज्यपालांनी भूमिका न घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडून फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली. तेव्हा आमदारांची जुळवाजुळव आणि बहुमतासाठी राज्यपालांनी अजित पवारांना ८ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र जेव्हा शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला.

मुंबई : भगतसिंह गोपालसिंह कोश्यारी(Governer Bhagatsinh Koshyari), वय वर्ष 80. मागच्या अडीच वर्षांपासून घटनात्मक पदावर असलेले कोश्यारी नेहमी राजकीय आरोपांनी चर्चेत राहिले. वादग्रस्त विधानं आणि भूमिकांमुळे आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत आणि वादात राहिलेल्या राज्यपालांच्या यादीत भगतसिंह कोश्यारी अव्वल आहेत. राज्यपालांचं पद घटनात्मक आहे. राज्यपालांच्या नावापुढे महामहिमही म्हटलं जातं. मात्र कोश्यारींनी स्वतःच ओढवून घेतलेल्या वादांमुळे राज्यपालांवर पहिल्यांदाच टोकाची टीकाही झाली. कोश्यारींवर सर्वात मोठा आरोप दुजाभावाचा आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीपासून राज्यपाल कोश्यारी पहिल्यांदाच चर्चेत आले. शपथेवेळी लिहिलेल्याऐवजी इतर शब्दांचा उच्चार केल्यामुळे कोश्यारींनी शपथ रोखली. मात्र तीच गोष्ट नंतर शिंदेंच्या शपथविधीवेळी झाली, तेव्हा मात्र राज्यपालांनी भूमिका न घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडून फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली. तेव्हा आमदारांची
जुळवाजुळव आणि बहुमतासाठी राज्यपालांनी अजित पवारांना ८ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र जेव्हा शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला.
तेव्हा ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी २ दिवसांचा वेळ दिला. पवार-फडणवीसांचा सकाळी-सकाळी शपथविधी घेणाऱ्या
राज्यपालांनी मविआतल्या 12 आमदारांच्या यादीवर दोन वर्षात स्वाक्षरीच न केल्यामुळे त्यांच्यावर वेळकाढूपणाचाही आरोप झाला.  जेव्हा कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य सरकार मास्कचं आवाहन करत होते. तेव्हा एका कार्यक्रमात खुद्द राज्यपालांनीच सन्मान देताना महिलेच्या चेहऱ्यावरचा मास्क हटवला होता. या घटनेवरुन राज्यपाल टीकेचे धनी बनले. या घटनेनंनतर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन नव्या वादाला तोंड फोडलं. आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवरच्या आक्षेपार्ह शब्दांबद्दलही राज्यपालांविरोधातला संताप उसळून आला.यानंतर शिंदे सरकारला मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय बहुमत चाचणीसाठी जे अधिवेशन बोलावलं.  तो वाद सुद्धा
सध्या कोर्टात आहे. त्यात आता राज्यपाल भगतसिंह कोशारींनी जर गुजराती आणि राजस्थानी व्यावसायिक मुंबईत नसते, तर मुंबई आर्थिक राजधानीच होऊ शकली नसती. असं बोलून नव्या वादाला आमंत्रण दिलंय. राज्यपाल हे केंद्र आणि राज्य यांच्यातला दुवा असतात. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीपेक्षा त्या पदाला जास्त महत्व आहे. त्यामुळे आपण राज्यपाल या पदाचीच प्रतिष्ठा तर कमी करत नाही आहोत ना, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी.

Published on: Jul 30, 2022 09:37 PM