Special Report | पती समीर वानखेडेंच्या बचावासाठी पत्नी क्रांती रेडकर मैदानात
गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक आरोपांची राळ उडवून देत आहेत. मलिकांच्या आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : “एनसीबीचे विभागीय संचालक तथा माझे पती समीर वानखेडे यांच्याविरोधात एक पूर्ण यंत्रणा काम करते आहे. पण मला विश्वास आहे की आरोप करणाऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत. मागील 15 वर्षांचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर एकही आरोप नाही. अनेकांना त्यांच्या कामाचा त्रास होतोय. ज्यांना त्रास होतोय तीच लोकं समीर यांच्या पाठीमागे लागली आहेत”, असं समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक आरोपांची राळ उडवून देत आहेत. मलिकांच्या आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
कोकाटेंविरोधात इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं लिलावतीत दाखल, झालं काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
