मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडेंचं नाव? आणखी कोणाला मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही एक "तांत्रिक चूक" असल्याचे स्पष्ट केले असून सर्व ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कायम राहील, अशी दुरुस्ती यादी लवकरच सादर करण्यात येईल असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही एक “तांत्रिक चूक” असल्याचे स्पष्ट केले असून सर्व ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कायम राहील, अशी दुरुस्ती यादी लवकरच सादर करण्यात येईल असे स्पष्ट केले.
दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांशी भेट, अशा अनेक घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या कोणत्यातरी कोपऱ्यात चलबिचल सुरूच आहे, अशी चर्चा होती. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा सगळं सुरळीत होणार असल्याचं वृत्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत वरिष्ठ नेत्यांना स्थान असणार आहे, असं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये पटेल, तटकरेंसह, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील या नेत्यांची नावे असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल

