संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्ष हे स्वतंत्रपणे लढले होते. मात्र आता महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्ष युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष: या चर्चेमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे.