
भारतात क्रिकेट खेळाचे प्रचंड गारुड आहे. क्रिकेट खेळाची लोकप्रियता,स्टारडम, आणि पैसा यामुळे अनेक खेळाडू गडगंड श्रीमंत झाले आहेत.आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, ब्रांड एंडोर्समेंट, बिजनेस आणि गुंतवणूक माध्यमातून खेळाडूंच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. दि क्रिकेट पांडा च्या रिपोर्टनुसार भारताचे सर्वात सात श्रीमंत खेळाडू कोणते ते पाहूयात..
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडूलकर भारतातच नाही तर जगातला सर्वात श्रीमंत किक्रेटपटू आहे. त्यांची श्रीमंती केवळ मैदानापर्यंत मर्यादित असते. तसेच Adidas, Coca-Cola सारख्या ब्रँड्सशी संलग्न असल्याने, स्वत:चा कपड्यांचा ब्रँड ‘True Blue’ आणि SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंट सारख्या बिझनेसमुळे त्यांची नेटवर्थ सुमारे 1,416 कोडी रुपयांवर (170 दशलक्ष डॉलर) पोहचला आहे. निवृत्तीनंतर देखील त्यांचा ब्रँड व्हॅल्यु आणि कमाईत कोणतीही कमी झालेली नाही.
महेंद्र सिंह धोनी कमाईत स्वत:स बेजोड सिद्ध केले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असल्याने आयपीएलमधून कोट्यवधी कमाई होत आहे. त्याशिवाय Reebok, Gulf Oil, आणि Sonata सारखा ब्रँड सोबत त्याने करार केला आहे. तसेच Chennaiyin FC फुटबॉल टीम आणि SportsFit फिटनेस चेन सारख्या गुंतवणूकीतून त्यांची एकूण संपत्ती 917 रुपयांहून अधिक झाली आहे.
भारतीय क्रिकेटचा सध्याचा सुपरस्टार विराट कोहली मैदानावरील आक्रमक खेळ आणि ब्रँडींगमध्ये स्मार्ट विचारासाठी ओळखला जातो. Puma, Audi, MRFसारखे ब्रँड त्याच्या हाताशी आहेत. तसेच RCB आयपीएल करारातून तो सर्वात महागडा खेळाडू म्हणून ओळखला जातो.त्याने Chisel जिम चेन आणि WROGN सारख्या कपड्यांच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याची अंदाजित संपत्ती 834 कोटी रुपयांहून (100 दशलक्ष डॉलर)मानली जाते.
टीम इंडियाला जिंकण्याचा विश्वास देणारा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मैदानासह ऑफ द फिल्ड देखील त्याचे स्थान मजबूत केले आहे. Pepsi, Puma, आणि Tata सारख्या कंपन्यांच्या सोबतच्या कराराने त्याची कमाई वाढली आहे. त्याची एकूण संपत्ती 667 कोटी रुपये आहे.
आपल्या धडाकेबाज फलंदाजी मुळे प्रसिद्ध असलेला वीरेंद्र सहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कॉमेंट्री, कोचिंग आणि ब्रँड प्रसिद्धीद्वारे चांगली कमाई केली आहे. Adidas आणि Boostब्रँड त्याचा करार अनेक वर्षे होता. आज सेहवागची संपत्ती 334 कोटींचा आसपास आहे.
युवराज सिंह याने क्रिकेटमध्येच नाही तर आपल्या बिझनेस क्षेत्रातही कमाई केली आहे. त्याने Puma, Pepsi आणि Revital सारख्या ब्रँड सोबत काम केले आहे. त्याने आपला स्टार्टअप फंड ‘YouWeCan Ventures’ द्वारे अनेक नवीन कंपन्यात गुंतवणूक केली आहे. युवराजची संपत्ती आजच्या घडीला 292 कोटी रुपये मानली जाते.
भारतीय क्रिकेटचे पहीले सुपरस्टार मानले जाणारे सुनील गावस्कर यांनी आता कॉमेंट्री आणि मिडीयात मोठी कारकीर्द केली आहे. त्यांच्याकडे Thums Up आणि Dinesh सारखे ब्रँड आहेत. टीव्ही आणि इतर क्षेत्रात त्यांचा सतत वावर आहे. 74 वर्षांत त्यांची संपत्ती 262 कोटी रुपयांच्या आसपास आहे.