Onion Rate : खरिपात उत्पादन घटलं अन् उन्हाळी हंगामात घटत्या दराने सर्वकाही हिसकावलं, कांदा नुकसानीचाच

| Updated on: Mar 28, 2022 | 10:08 AM

खरीप हंगामातील लाल कांदा बाजारपेठेत दाखल होत असताना किमान सरासरीएवढा का असेना कांद्याला दर होता. पण उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढताच दिवसागणीस कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. गतआठवड्यात 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 700 ते 800 रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. कांदा दराच्या लहरीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये जागतिक बाजारपेठांमध्ये आयात बंदी आणि उन्हाळी कांद्याची वाढती आवक यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे.

Onion Rate : खरिपात उत्पादन घटलं अन् उन्हाळी हंगामात घटत्या दराने सर्वकाही हिसकावलं, कांदा नुकसानीचाच
चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक होताच दर घसरले आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : खरीप हंगामातील लाल कांदा बाजारपेठेत दाखल होत असताना किमान सरासरीएवढा का असेना कांद्याला दर होता. पण (Summer Season) उन्हाळी हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक वाढताच दिवसागणीस कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. गतआठवड्यात 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असलेला (Onion Rate) दर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 700 ते 800 रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. कांदा दराच्या लहरीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये जागतिक बाजारपेठांमध्ये आयात बंदी आणि उन्हाळी कांद्याची वाढती आवक यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. खरिपात अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली होती तर उन्हाळी हंगामात आवक वाढल्याने कवडीमोल मिळत आहे. चोहीबाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा यावर भर असतो मात्र, पिकाचे नुकसान अन्यथा दरामुळे होणारी परवड ही ठरलेलीच आहे.

कांदा दरात अशी झाली घसरण

महिन्याभरापूर्वीच लाल कांद्याची मर्यादित आवक होत असताना 3 हजार ते 3 हजार 200 रुपये क्विंटल असा दर कांद्याला होता. मात्र, उन्हाळ कांद्याची आवक सुरु होताच दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. घसरत्या दरामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची गडबड केली आणि दिवसाकाठी कांद्याची विक्रमी आवक सुरु झाली याचाच परिणाम दरावर झाली आहे. सध्या उन्हाळी कांद्याला 700 ते 800 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.त्यामुळे काही शेतकऱ्यांचे साधले तर काही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे.

दरातील लहरीपणामुळे उत्पादनावरील खर्च निघेना

कांदा दरातील लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. रात्रीतूनच दर घसरत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उन्हाळी कांद्याची लागवड वाढली आहे. त्यामुळे आगामी काळातही कांद्याची आवक वाढतच राहणार आहे. यामुळे अणखी किती दर कमी होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, सध्याच्या दरानुसार कांदा छाटणी, काढणी आणि बाजारपेठेपर्यंतचा वाहतूकीचा खर्चही या कांद्यातून शेतकऱ्यांना मिळत नाही. हंगामाच्या सुरवातीला ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे.

दर घटले आवक वाढली

कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे काढणी, छाटणी आणि लागलीच कांद्याची विक्री केली जाते. ज्यांच्याकडे कांदाचाळ आहे तेच शेतकरी साठवून ठेवतात. मात्र, सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे काढणी झाली की बाजारपेठेत कांदा दाखल होत आहे. येथील चाकण बाजारसमितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाल्याने दरात मोठी घसरण होत आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो चिंता सोडा कामाला लागा, पंजाब डख यांचा पावसाविषयी काय आहे अंदाज?

Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे

Soybean : उन्हाळी हंगामात विक्रमी सोयाबीन, खरिपातील बियाणांचाही प्रश्न लागणार मार्गी