शेतकऱ्यांनो चिंता सोडा कामाला लागा, पंजाब डख यांचा पावसाविषयी काय आहे अंदाज?

शेतकऱ्यांनो चिंता सोडा कामाला लागा, पंजाब डख यांचा पावसाविषयी काय आहे अंदाज?
अकोला येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हवामान तज्ञ पंजाबराव डख
Image Credit source: TV9 Marathi

गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारितच शेती व्यवसाय झाला आहे. यावरच उत्पादन आणि पीक पध्दती ठरत आहे. शिवाय हवामान तज्ञांनी वर्तवलेले अंदाजही अचूक ठरत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. उपाययोजनाबाबत शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या सल्ल्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे यंदा पावसाबाबत त्यांचा अंदाज काय राहिल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

गणेश सोनोने

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 28, 2022 | 9:32 AM

अकोला : गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारितच (Farming) शेती व्यवसाय झाला आहे. यावरच उत्पादन आणि पीक पध्दती ठरत आहे. शिवाय (Weather experts) हवामान तज्ञांनी वर्तवलेले अंदाजही अचूक ठरत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. उपाययोजनाबाबत शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना हवामान तज्ञ (Panjabrao Dakh) पंजाबराव डख यांच्या सल्ल्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे यंदा पावसाबाबत त्यांचा अंदाज काय राहिल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अकोल्यातील तेल्हारा तालुका कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला असून यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस असल्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता सोडून उत्पादनवाढीच्या अनुशंगाने पिकांचे गणित मांडावे असाही सल्ला दिला आहे. गेल्या वर्षभरापासून डख यांच्या अचूक अंदाजाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

पेरणीपूर्व पाऊस हा महत्वाचा

ऐन पेरणीच्या कालावधीमध्ये पाऊस झाला तर शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती होते. त्यामुळे पेरणीपूर्व म्हणजेच 15 ते 30 मे च्या दरम्यान पाऊस झाला तर तो पेरणीयोग्य पाऊस असतो. किमान 100 मीमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवणे फायद्याचे ठरणार आहे. रब्बीची पेरणी घाईत आणि खरीप दमानं ही म्हणच आहे. त्यामुळे योग्य पाऊस झाल्यावरच पिकांचा पेरा केला तरच वाढ आणि उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

पर्यावरणाचा समतोलही महत्वाचा

पर्यावरणाचा असमतोल झाल्यानेच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची प्रमाण वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. झाडे नसल्याने पाऊस येत नाही असे जरी असले तरी झाडे नसतांना पडणारा पाऊस हा घातक स्वरुपाचा असतो तो पाऊस रिमझिम आणि पोषक पडण्यासाठी झाडे असणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पाऊस जास्त पडत असल्याचेही डख यांनी सांगितले.

शेतीकामे करताना अशी घ्या काळजी

शेतात काम करतांना विजा चमकत असतील तर मोकळ्या मैदानात, झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ अथवा सौरऊर्जाच्या उपकरणांजवळ उभे राहु नये. या ठिकाणी विज पडण्याची शक्यता जास्त असते.अशा संकटकाळी गवताची पेंडी पायाखाली घेऊन जमीनीच्या खोलगट भागात कानावर हात ठेवून बसावे जेणेकरून विजेचा धोका टाळता येईल. पर्यावरणाच्यादृष्टीने वीज पडणे चांगले असले तरी शेतकरी शेतमजूर यांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे.पर्यावरणातील विविध दाखले देत हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी केलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे

Soybean : उन्हाळी हंगामात विक्रमी सोयाबीन, खरिपातील बियाणांचाही प्रश्न लागणार मार्गी

मधमाश्यांचे पालन, अल्पभूधारकांचे वाढेल उत्पादन, कृषी विज्ञान केंद्राकडूनही मदतीचा हात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें