Sindhudurg : नैसर्गिक संकटानंतर आता गवारेड्यांचा धुमाकूळ, मदत नको बंदोबस्त करा..!

| Updated on: Jul 29, 2022 | 12:24 PM

यंदा खरिपातील धान पिकांच्या लागवडीला उशिर झाला आहे. यातच पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहे पण अजूनही पिके ही पाण्यात आहेत. शेत शिवारात वाफसा नसताना गवारेडे हे धान पिक खाण्यासाठी शेताचा तुडवा करीत आहेत. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. आता कुठे पावसाने उसंत घेतली असली तरी नुकसान मात्र, सुरुच आहे. गवारेड्यांनी शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे.

Sindhudurg : नैसर्गिक संकटानंतर आता गवारेड्यांचा धुमाकूळ, मदत नको बंदोबस्त करा..!
गवारेड्यामुळे सिंधुदुर्गामध्ये धान पिकाचे नुकसान
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सिंधुदुर्ग : (Kokan) कोकणासह राज्यात आता कुठे पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे पीक वाढीस पोषक वातावरण होत असताना मात्र, सिंधुदुर्गात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. गवारेडे हे थेट शेत शिवारात घुसखोरी करीत असून (Crop Damage) पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा कमी झाला असला पिकांवरील संकट हे कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या (Wild animals) वन्यप्राण्यामुळे भातशेतीचे अधिकचे नुकसान होत आहे.मालवण येथील पेंडुर पाठोपाठ कणकवली तालुक्यातही गवारेड्यांनी शेतकऱ्यांना त्रस्त केले आहे. वन्यप्राण्याच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत मिळते पण आर्थिक मदत नको तर या गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पिकांची नासधूस

यंदा खरिपातील धान पिकांच्या लागवडीला उशिर झाला आहे. यातच पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहे पण अजूनही पिके ही पाण्यात आहेत. शेत शिवारात वाफसा नसताना गवारेडे हे धान पिक खाण्यासाठी शेताचा तुडवा करीत आहेत. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. आता कुठे पावसाने उसंत घेतली असली तरी नुकसान मात्र, सुरुच आहे. गवारेड्यांनी शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे मेहनतीने उगवलेल्या पिकाची नासधूस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मदत नको बंदोबस्त करा

गवारेड्यांकडून नुकसान हे दरवर्षीचे ठरलेलेच आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होतोच पण शेतकऱ्यांसाठी देखील हे धोक्याचे आहे. या भागात वनाचे क्षेत्र अधिक असल्याने त्यांचा उपद्रव वाढत आहे. नुकसान होताच वनविभागाकडून पंचनामे केले जातात पण मिळणारी मदत फारच तुटपूंजी असते त्यामुळे मदत नको तर वन्यप्राण्यांचा बंदोबस्तच करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान अन् वन विभागाचा नाईलाज यामध्ये धान पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे.

हे सुद्धा वाचा

धान पिकाच्या उत्पादनात होणार घट

यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि आता गवारेड्यांचा प्रादुर्भाव यामुळे धान पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाचे थैमान राहिल्याने धानपिक हे पाण्यात राहिले. त्यामुळे वाढीवर परिणाम झाला आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ होत असतानाच गवारेड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पिकांवरील संकट हे कायम आहे. या दोन्ही बाबींमुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज आहे.