शेतात मोबाईल चार्जिंग, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी शेतकरी पुत्राचा जुगाड

| Updated on: Jan 27, 2023 | 11:11 AM

शेतकरी पुत्र चर्चेत, शेतात तयार केलेल्या मचाणमध्ये मोबाईल चार्जिंगसह विविध सुविधा, जुगाड पाहण्यासाठी लोकांची गर्दी

शेतात मोबाईल चार्जिंग, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी शेतकरी पुत्राचा जुगाड
मचाण
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वर्धा – शेतातील उभ्या असलेल्या पीकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी (farmer) लाकडी मचाण तयार करुन शेतात वस्तीला थांबतात. पण शेतकऱ्यांना शेतात थांबल्यानंतर अनेक अडचणी येतात. ती समस्या एका शेतकरी पुत्राने सोडवल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील (wardha) कासारखेडा (kasarkheda) येथील योगेश लिचडे याने मजबूत स्ट्रक्चरचं सुविधायुक्त मचाण तयार केलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे.

शेतकरी मचाण

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे याने घरी शेती असल्यामुळं त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. शेतात पिकांची निगराणी करताना लाकडी मचाणीवर थांबतानाही शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळं योगेशनं सुरक्षित मचाण तयार करण्यासाठी प्रयत्न केला. शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यप्राणी त्याचबरोबर पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा, यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले. हे मजबूत स्ट्रक्चरच मचाण शेतक-यांसाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

तयार करण्यात आलेल्या मचाणाची माहिती

मचाणची उंची 5 ते 6 फूट आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक लावण्यात आले आहे. वरील भागावर सोलर पॅनल लावलाय. त्याचबरोबर सोलरवर ऑपरेटिंगवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास त्याला झुला देखील लावलाय. अनेक शेतकऱ्यांनी अशा मचाणची मागणी केली आहे.त्याचबरोबर त्यांच्या मागणीनुसार मचान देणार असल्याचं योगेशन शेतकऱ्यांना सांगितलं आहे.

wardha

मचाणकरीता लोखंडी तसेच आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. भविष्यात कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्याना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं योगेशन सांगितलंय.