लॉकडाऊन लागल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी, कोणत्या योजनेद्वारे सरकारनं दिले पैसे?

| Updated on: Apr 11, 2021 | 5:29 PM

पीएम किसान योजनेअंतर्गत 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन लागल्यापासून 63 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेत. pm kisan samman scheme

लॉकडाऊन लागल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी, कोणत्या योजनेद्वारे सरकारनं दिले पैसे?
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्रालयानं पीएम किसान योजनेअंतर्गत 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन लागल्यापासून 63 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (Agriculture Department claimed 63 thousand crore rupees gave to farmers through pm kisan samman scheme)

शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन लागू केला होता. तेव्हापासून 31 मार्च 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार 275.57 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये एका हप्त्यामध्ये पाठवले जातात. एका वर्षामध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 7 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत.

पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता लवकरच

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी टीव्ही -9 शी खास बातचीत करताना सांगितले की, एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुमारे 20 ते 25 तारखेपर्यंत सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपयांचा हप्ता जमा होईल. पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती.

पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही

(1) संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी
(2) नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
(3) केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
(4) प्राप्तिकर भरणारे शेतकरी
(5) 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
(6) डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

संबंधित बातम्या:

फक्त 55 रुपयांच्या बचतीवर वर्षाला 36 हजार मिळणार, पीएम किसान मानधन योजनेसाठी 21 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

PM-Kisan : पंतप्रधान किसान योजनेच्या आठव्या हप्त्याची तयारी सुरु, जाणून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहचणार पैसे

(Agriculture Department claimed 63 thousand crore rupees gave to farmers through pm kisan samman scheme)