AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीची औषध फवारणी झाल्यामुळे ९०० झाडं खराब, शेतकऱ्याच्या आरोपामुळे…

चुकीच्या औषध फवारणीमुळे एका शेतकऱ्यांची संपूर्ण बाग खराब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी केंद्र चालकाच्या चुकीच्या औषधामुळे हा प्रकार झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांने केला आहे.

चुकीची औषध फवारणी झाल्यामुळे ९०० झाडं खराब, शेतकऱ्याच्या आरोपामुळे...
Orange crop destroyedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2023 | 11:37 AM
Share

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात एका शेतकऱ्याला जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावणे एका कृषी केंद्र चालकाच्या चांगलचं अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी केंद्र चालकाने जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावली असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. संत्राच्या झाडावर (orange crop destroyed) औषध फवारणी केल्यानंतर ९०० झाडं बाधित झाली आहेत. झाडांना लागलेली फळ गळून पडू लागल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काही शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. आजा अमरावती जिल्ह्यातील कृषी विभाग (Agricultural news) केंद्र चालकावरती कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कृषी केंद्र चालकाने चुकीचे औषधे जबरदस्ती दिल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील दिलालपुर येथील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली. त्यावेळी दुकानात असलेल्या कृषी केंद्र चालकांनी सांगितलेले औषध दिले नाही. इतर औषध दिले अशी माहिती संत्रा उत्पादक शेतकरी केशव दाभाडे आणि माणिक दाभाडे यांनी केली.

९०० झाडं बाधित

ज्यावेळी कृषी केंद्र चालकाने दिलेल्या औषधांची फवारणी संत्रांच्या झाडांवर केली. त्यावेळी संत्रा झाडांची पानं गळून पडली. त्यानंतर काहीवेळाने संत्रा फळ सुध्दा गळून खाली पडले आहे. काही संत्राची फळ झाडांवर पिवळी होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांची ९०० झाडं बाधित झाली असून त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.

कृषी विभागाकडे याबाबत तक्रार

शिवार कृषी केंद्राचे संचालक अनिकेत घोरमाडे यांच्यावर शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, की त्यांनी चुकीची औषध दिली. अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागाकडे याबाबत तक्रार दाखल झाली असून शिवार कृषी केंद्राचा परवाना रद्द करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.