Beed : घरी लेकीच्या लग्नाची घाई अन् गोठ्यात अग्नितांडव, बीडमधील शेतकऱ्यांच्या समस्या कायम

| Updated on: May 15, 2022 | 12:39 PM

रब्बी हंगामात अथक परिश्रम घेऊन अशोक बांगर व लक्ष्मण बांगर यांनी उत्पादन घेतले होते. शिवाय शेतीमालाची साठवणूक ही शेतामधील गोठ्यातच केली होती. मात्र, अचानक गोठ्याला लागलेल्या आगीत सर्वकाही मातीमोल झाले आहे. या दोन्ही भावांनी जनावरांसाठी गोठ्यासमोरच कडब्याच्या गंजी उभ्या केल्या होत्या तर गोठ्यातील 10 क्विंटल लसून, ऊस, जनावरांचा गोठा असे 4 लाखाचे नुकसान झाले आहे.

Beed : घरी लेकीच्या लग्नाची घाई अन् गोठ्यात अग्नितांडव, बीडमधील शेतकऱ्यांच्या समस्या कायम
बीड जिल्ह्यात कडब्याच्या गंजीला आग लागल्याची घटना
Follow us on

बीड : जिल्ह्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना इतर समस्यांनी शेतकरी त्रस्त आहे. रब्बीतील शेतीकामे आटोपून मुलीच्या लग्नकार्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्याच्या समोर नवीनच समस्या उभी ठाकली आहे. (Beed) तालुक्यातील खंडाळा येथील अशोक बांगर यांनी जनावरांसाठी साठवलेल्या (Fodder Crop) कडबा गंजीला आणि गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अशोक बांगर व त्यांचे बंधू लक्ष्मण बांगर यांच्या कडब्याच्य़ा गंजी तर आगीच्या भक्ष्यस्थानी ठरल्या आहेतच पण इतर शेती साहित्याचीही राखरांगोळी झाली आहे. एकीकडे लग्नसमारंभासारखा सोहळा अन् शेतामध्ये हे विघ्न. गोठ्याच्या परिसरात लावलेल्या गंजी तर जळाल्याच शिवाय इतर साहित्याचे देखील नुकासान झाले आहे.

सर्वकाही मातीमोल

रब्बी हंगामात अथक परिश्रम घेऊन अशोक बांगर व लक्ष्मण बांगर यांनी उत्पादन घेतले होते. शिवाय शेतीमालाची साठवणूक ही शेतामधील गोठ्यातच केली होती. मात्र, अचानक गोठ्याला लागलेल्या आगीत सर्वकाही मातीमोल झाले आहे. या दोन्ही भावांनी जनावरांसाठी गोठ्यासमोरच कडब्याच्या गंजी उभ्या केल्या होत्या तर गोठ्यातील 10 क्विंटल लसून, ऊस, जनावरांचा गोठा असे 4 लाखाचे नुकसान झाले आहे. भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

घरात लग्नाची घाई अन् शेतात विघ्न

अशोक बांगर यांच्या मुलीचे लग्न हे काही दिवसांवर येऊन ठेपले होते. त्यामुळे ते लग्न कामात व्यस्त होते. शिवाय शेती कामेही त्यांनी या समारंभामुळेच आटोपती घेतली होती. आता कडब्याच्या गंजी लावून ते लग्न कार्यातील एक-एक काम उरकते घेत होते. मात्र, रविवारी सकाळी शेतामधील गोठ्याला अचानक आग लागली. यामध्ये गोठ्यातील साहित्य तर जळून खाक झालेच पण गोठ्याला लागून असलेल्या दोन्ही गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी झाल्या. यामळे लग्नात विघ्न तर आलेच पण चार लाखाचे नुकसान हे वेगळेच. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

हे सुद्धा वाचा

जनावरांसाठी कडब्याची जुळवाजुळव

वर्षभर जनावरांना चारा लागतो. त्यामुळे अशोक बांगर व लक्ष्मण बांगर या दोघा भावांनी कडब्याची जुळवाजुळव करुन गंजी रुपाने साठवणूक केली होती. मात्र, वाढते ऊन आणि वाऱ्यामुळे ही या आगीने अवघ्या वेळेत रौद्ररूप धारण केले होते. परिसरातील नागरिकांना आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, वाढत्या आगामुळे त्यांनाही ते शक्य झाले नाही.