उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून मळणीला सुरुवात

राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामध्ये रब्बी हंगामातील काढणीला आलेली पुर्णपणे खराब झाली आहेत.

उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून मळणीला सुरुवात
grain harwesting
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 30, 2023 | 1:15 PM

पुणे : पुण्याच्या भोर (pune bhor) तालुक्यातील ग्रामीण भागात, हरभरा काढणीच्या (grain harvesting) कामांना वेग आला आहे. उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून तो भरडायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. हरभरा काढून त्याची मळणी करून त्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पहायला मिळत आहे. सततच्या वातावरणाच्या बदलामुळे यंदा हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या आठ दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसान झालेली पीकं काढताना शेतकरी आपल्या वेदना सांगत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामध्ये रब्बी हंगामातील काढणीला आलेली पुर्णपणे खराब झाली आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी आता सरकारकडून काय मदत मिळणार याची वाट पाहत आहेत. नाशिक, नांदेड, धुळे, नंदुरबार, सांगली, पुणे या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं आहे. सरकारी दरबाजे पंचनामे झाले आहेत. परंतु खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही.

10 वर्षांपासून बाजार समितीवर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होऊन तीन दिवस झाले आहेत. तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशन फॉर्म तीनचं विक्री झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त मुंडे बहिण भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोघाही बहिण भावाचा पॅनल निवडणुकीत उभा राहिला आहे. मागील 10 वर्षांपासून बाजार समितीवर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व आहे. राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची बाजार समिती मानली जाते. एकूण 18 सदस्य असून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान आता या निवडणुकीत धनंजय मुंडे आपलं वर्चस्व कायम राखणार की ? पंकजा मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.