बांबू गेला गगनावरी! पडीक जमिनीवर बांबू शेतीचा अभिनव प्रयोग, शेतकरी मालामाल, सांगली पॅटर्न राबवणार कोण?
Bamboo Farming Sangli: पडीक जमिनीवर बांबू शेतीचा अभिनव प्रयोग राबवला गेला. डोंगराळ, खडकाळ माळरान हिरवागार झाला. या सांगली पॅटर्नची सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. हा सांगली पॅटर्न राबवणार कोण?

Bamboo Farming Sangli Pattern: राज्यात शेती क्षेत्रात विविध प्रयोग सुरू आहेत. कोणी इंजिनिअरिंग सोडून शेतीकडे वळले आहेत. तर काही कलाकारांनी स्टे होम सुरू केले आहे. असाच एक अभिनव प्रयोग सांगली जिल्ह्यात राबवला गेला आहे. त्यात जिल्ह्यातील पडीक, खडकाळ, माळरान, डोंगराळच नाहीतर ओसाड जमिनीवर बांबू लागवड करण्यात आली. हा प्रयोग कोरना काळात सुरू करण्यात आला. त्याला आता अभूतपूर्व यश आले आहे. लागवडीपासून ते तोडणीपर्यंतच्या या प्रयोगाने यशाचा धडा गिरवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमाईचे साधन मिळाले आहे. बांबू हा बहुगणी म्हणून ओळखल्या जातो. बांबूपासून अनेक वस्तू तयार होतात. अन्न पदार्थांपासून ते औषधांपर्यंत बाबूंचा उपयोग होतो. अनेक लोक निसर्गाकडे वळत असताना या प्रयोगाने राज्यातील बरड जमीनधारक शेतकर्यांना एक प्रेरणा दिली आहे. रडत बसण्यापेक्षा अभिनव शेतीने कायापालट होऊ शकतो हे या प्रयोगाने दाखवून दिले आहे.
नापीक जमिनीतून कष्टाचे फळ
नापीक जमिनी, बरड, डोंगराळ, खडकाळ, माळरानावर कोणतेही पीक येत नव्हते. तर काही पट्ट्यात केवळ पावसाच्या पाण्यावर एक पीक उणंपुरं हाती येत होतं. अशा ठिकाणी अवघ्या साडेचार वर्षात चमत्कार झाला. कष्टाला फळ मिळाले. गेल्या साडेचार वर्षात एकरी 15 ते 32 टनांपर्यंत बाबू उत्पादन घेतले आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना एक नवीन दिशा आणि उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. हा प्रयोग त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.
प्रतिटन 3500 ते 4000 रुपये दर
कोरोनापासून हा प्रयोग करण्यात आला. बाबू लागवड करण्यात आली. या उघड्या बोडक्या माळरानावर बांबू लागवड यशस्वी ठरली. बांबू शेती बहरली. चांगल्या दर्जाचे बांबू उत्पादन झाले. या बांबूची यशस्वी तोडणी झाली. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 3500 ते 4000 रुपये दराने उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे चांगले साधन मिळाले. तर भविष्यात गुणवत्तेनुसार या बांबूला प्रतिटन 4,000 ते 6,000 रुपयांपर्यंत दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या मते बांबू लागवडीचे अनेक फायदे आहेत. पडीक आणि माळरानावर बांबू लागवड अत्यंत फायदेशीर आहे. बांबूची लागवड आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करणारी आहे. बांबू लागवड पर्यावरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. बांबू शेतीमुळे मातीची धूप थांबते. तापमान वाढ कमी होण्यास मदत मिळते. बांबूची मूळ जमिनीत घट्ट पकड घेतात. त्यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. योग्य मार्गदर्शनाखाली ही शेती केली तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अधिक उत्पन्न मिळू शकते. बांबूचा उपयोग बांधकाम, फर्निचर, कागद निर्मिती, ऊर्जा आणि हस्तकला अशा अनेक उद्योगांमध्ये बांबूचा उपयोग होतो. त्यामुळे बांबूला मोठी मागणी असते.