मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे, हवामान खात्याने…

| Updated on: Jun 09, 2023 | 10:47 AM

बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश भागातील शेती कोरडवाहू आहे. तर काही भागात सिंचनाची सोय असल्याने ओलिताखाली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी निराश झाला होता.

मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे, हवामान खात्याने...
buldhana news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : मृग नक्षत्र सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी असल्याने बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामासाठी लगबग सुरू केली आहे. नांगरणे, वखरणे, शेतातील खोलगट उंच असलेल्या जमिनीचे सपाटीकरण करणे, झाडाची खोड काढणे आदी कामे जोमाने सुरू आहेत. यावर्षी पुरेसा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांसाठी (maharashtra farmer news) सुगीचे दिवस येतील, अशी आशा बाळगून शेतकरी पेरणीपूर्ण मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी नागरिकांना (agricultural news in marathi) उष्णतेपासून दिलासा मिळाला.

बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश भागातील शेती कोरडवाहू आहे. तर काही भागात सिंचनाची सोय असल्याने ओलिताखाली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी निराश झाला होता. यामुळे उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील वर्षी पुरेशा प्रमाणात उत्पादन झाले नसले, तरी ती चिंता बाजूला सारून शेतकरी पुन्हा नव्या जोमात खरीप हंगामाकडे वळला आहे.

हे सुद्धा वाचा

धुळे जिल्ह्यात आता शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. मान्सूनपूर्व तयारीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. बी-बियाणे, खतांच्या खरेदीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. आता मोठ्या प्रमाणात बियाणांची आणि खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकले जाण्याची भीती लक्षात घेता, कृषी विभाग सतर्क झाला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये कृषी विभागाने तब्बल 193 कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. येणाऱ्या काळात ही कारवाई अधिक तीव्र केले जाणार असल्याचे संकेत कृषी विभाग दिले आहेत. बियाणांची किंमत, गुणवत्ता तसेच साठेबाजी आणि लिंकिंगच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तळवी यांनी दिली आहे.